🌟अज्ञात वाहन व चालका विरुद्ध वन गुन्हाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वन अधिकारी करत आहेत🌟
फुलचंद भगत
वाशिम:-मालेगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर डव्हा परिसरात दि.15 डिसेंबर 2024 रविवार रोजी समृद्धी महामार्ग chainage नंबर 231+200 येथे अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
कुरळा, डव्हा, या परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्या वावरत आसल्याचे काही शेतकरी मध्ये चर्चा होती. पण शेतातील गहू, हरबरा पिकाला पाणी किंवा रखवाली करण्यासाठी दिवसा आणि रात्री शेतात जाऊन लागते. अशा परिस्थितीत या परिसरात बिबट्या वावरत असल्याने शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून रात्री बे रात्री शेतातील पिकांच्या रखवाली साठी जातच असत, अशातच दि. १५ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावर एच पी पेट्रोल पंप जवळ डव्हा परिसरात समृद्धी महामार्गावर बिबट्या ला अज्ञात वाहनाने जबर धडक बसल्याने बिबट्या मृत अवस्थते मध्ये रोडवर असल्याची माहिती समृद्धी महामार्ग कर्मचारी यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर तात्काळ मतांवर ( साहाय्यक वनसंरक्षक वाशीम ), पि. एस. तिडके ( वनपरिक्षेत्र अधिकारी वाशीम ), मालेगाव वनपरिक्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी घटना स्थळी पोचून मोका पंचनामा करण्यात आला. तदनंतर पशुवैद्यकीय अधिकारी साठे यांना वनाधिकारी यांच्या उपस्थितीत घटना स्थळी नेऊन शव विच्छेदन करण्यात आले. यावेळी वनपाल के. टी. पवार, वनपाल व्हि. बी. इंगळे, अमाना, किन्हीराजा वर्तुळ मधील सर्व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. तर अज्ञात वाहन व चालका विरुद्ध वन गुन्हाची नोंद करण्यात आली असून. पुढील तपास वन अधिकारी करत आहेत.....
0 टिप्पण्या