🌟असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी यांनी केले आहे🌟
परभणी (दि.०२ डिसेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्यांनी ट्रेसिबिलीटीनेट अंतर्गत मोफत नोंदणी करीता अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी यांनी केले आहे.
या जिल्ह्यात विविध फळबाग योजनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंबा फळबागांची लागवड होत आहे. त्याद्वारे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होवून निर्यातक्षम दर्जाच्या आंबा फळाचे उत्पादन हे उत्पादक घेवू लागले आहेत. जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांबरोबर स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांमध्ये आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः कीटकनाशकांच्या उर्वरित अंशाबाबत मोठ्या प्रमाणात जागृतता निर्माण झाली असून आंबा फळांचे उत्पादन करुन युरोपियन व इतर देशांना हे फळ निर्यात केले जात आहे. युरोपियन देशांनी कीटकनाशके उरर्वत अंश मुक्तीची हमी अट घातल्याने सन २००४-२००५ पासून जिल्ह्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली मँगोनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची मोफत नोंदणी करण्यात येत आहे. यावर्षी ०१ डिसेंबर ते ३१ मार्च या कालावधीत ट्रेसीबिलीटी नेट प्रणालीवर ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार असून आंबा उत्पादक शेतकर्यांनी निर्यातीची बाब ओळखून या दृष्टीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गवळी यांनी केले आहे......
0 टिप्पण्या