🌟मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली नियुक्ती जाहीर🌟
✍️ मोहन चौकेकर
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाच्या नियुक्ता नुकत्याच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख ,विश्वस्त किरण नाईक , विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीकर यांनी जाहीर केल्या असुन प्रदेश उपाध्यक्षपदी बुलढाण्याचे चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
83 वर्षचा इतिहास असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष पदाच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या असून राज्याच्या उपाध्यक्ष पदावर दैनिक विश्वविजेताचे संपादक चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यांच्याकडे पश्चिम विदर्भाचा पदभार राहणार आहे. चंद्रकांत बर्दे हे गेल्या 30 वर्षापासून मराठी पत्रकार परिषदेशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यांच्याकडे यापूर्वी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या सरचिटणीस, कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार होता आणि सध्या ते बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी आल्यानंतर त्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख , विश्वस्त किरण नाईक , विश्वस्त शरदजी पाबळे , मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीकर आदींचे आभार मानले आहे....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या