🌟अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ भदंत उपगुप्त महाथेरो यांचे आवाहन🌟
पुर्णा (दि.१६ डिसेंबर २०२४) - परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील प्रतिकात्मक संविधान प्रतिकृतीची एका विकृतबुध्दीमत्तेच्या समाजकंटकाकडून दि.१० डिसेंबर २०२४ रोजी विटंबना करण्याचा गंभीर प्रकार घडला या घटनेच्या निषेधार्थ दि.११ डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागूले या घटने प्रकरणी पोलिस प्रशासनाने जवळपास चाळीस ते पन्नास जनांना ताब्यात घेतले यातील एक आरोपीस भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा कारागृहात असतांना मृत्यू झाला
परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये या दुर्दैवी घटनांमुळे मागील सहा दिवसांपासून तणावाची परिस्थिती असून संपूर्ण बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत शहिद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कारागृहात झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर काल रविवार दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी पुर्णेतील आंबेडकरवादी संघटनांसह व्यापारी बांधवांनी संपूर्ण व्यापार पेठ बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला परंतु आज सोमवार दि.१६ डिसेंबर रोजी राज्यातील आंबेडकरवादी पक्ष संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आज पुर्णा शहरात आठवडी बाजार असल्याने अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे अध्यक्ष पुज्य भदंत डॉ उपगुप्त महाथेरो केले आहे यांनी शहरातील सर्व आंबेडकरवादी व संविधानप्रेमींना आवाहन आहे असून त्यांनी केलेल्या आवाहनात असे नमूद केले आहे की परभणी संविधान विटंबना निषेधार्थ पूर्णा शहर कडकडीत २ वेळेस दि.११ डिसेंबर व दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी बंद करण्यात आले त्यामुळे आज सोमवार,दि.१६ डिसेंबर २०२४ रोजीचा आठवडी बाजार चालू ठेवण्यासाठी तमाम बांधवांनी सहकार्य करावे येणाऱ्या १५ दिवसात जिल्हा प्रशासन काय कारवाई करेल ? याची वाट पाहून त्यानंतर योग्य ते आंदोलन करण्यात येईल तेव्हा सर्वांनी पूर्णा शहरातील कायदा व सुव्यवस्था,शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आव्हान देखील पुज्य भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांनी केले असल्यामुळे शहरातील व्यापारी बांधवांनी तसेच शहरी व ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेत्यांनी याची दखल घेऊन आपापले सुरळीत सुरू ठेवावेत....
0 टिप्पण्या