🌟डॉ.आंबेडकरांना काँग्रेसने भारतरत्न देखील दिले नव्हते असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर केला🌟
नागपूर : देशासह राज्यात देखील मागील काही दिवसांपासून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच भारतीय संविधानावरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत या संदर्भात आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काँग्रेस पक्षावर आरोप केले आहेत. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की काँग्रेस पक्षाने कधीच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला नसल्याची जोरदार टिका केली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी घराण्याचा आरक्षणाला विरोध राहिला असल्याचे समोर आणले डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा काँग्रेसने अवमान वारंवार केला आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शहांचे अर्धवट भाषण कापून दाखवले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी काँग्रेसचे काय मत आहे ? ते संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कधीही निवडणुकीत निवडून येऊ दिले नाही. तसेच,त्यांचा ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झाला त्या इंदुमिल जागेवर स्मारक व्हावे यासाठी सुई इतकीदेखील काँग्रेसच्या काळात जमीन दिली नाही असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचा निषेध केला.
नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ३ हजारहून अधिक कोटींची जमीन राज्य सरकारला दिली आणि त्याठिकाणी स्मारक होत आहे. लंडनमधील घर लिलावात निघाले होते, त्यावेळी ते लिलावामध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केले. इंदूमिल असो, दिक्षाभूमी असो, प्रत्येक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचे काम मोदी आणि भाजपच्या सरकारने केले आहे. त्यांचे फक्त नाव वापरून राजकारण करायचे. पण आंबेडकरांना काँग्रेसने कधीही सन्मान दिला नाही. आंबेडकरांना काँग्रेसने भारतरत्न देखील दिले नव्हते असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर केला आहे.....
0 टिप्पण्या