🌟यावेळी पाथरी विधानसभेचे आ.विटेकर यांचीही उपस्थिती जिल्ह्यातील दोन्ही आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा🌟
महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे व पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांची भेट घेवून त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा निवड होऊन उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे व आमदार राजेश विटेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी मनमोकळा संवाद साधला याप्रसंगी आपल्या मतदारसंघातील समस्या व अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांना आश्वासन दिले........
0 टिप्पण्या