🌟यावेळी पोलिस निरीक्षक विलास गोबाळे यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले🌟
पुर्णा (दि.१८ डिसेंबर २०२४) - भारतीय संसदेमध्ये आज बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी काढलेल्या अनुद्गार काढून त्यांचा व त्यांच्या विचारांचा अवमान केल्यामुळे पुर्णेतील संतप्त आंबेडकरवादी जनसमुदायाने आज बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले
यावेळी आंबेडकरवादी व संविधान प्रेमी जनसमुदायाने अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली याशिवाय पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विलास गोबाळे यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले निवेदनावर गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध अस्पृश्यता निवारण कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करतेवेळी गृहमंत्री अमित शाह यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे पुर्णा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे,वंचित बहुजन आघाडीचे नेते दादाराव पंडित,मा.नगरसेवक ॲड.धम्मा जोंधळे,मुकुंद पाटील शाहीर गौतम कांबळे त्रिंबक कांबळे अखिल अहमद शेख खूप दूर शेख बशीर रमेश वरकुटे विजय जोंधळे अक्षय काळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.......
0 टिप्पण्या