🌟बिडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच...!


🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत स्पष्टीकरण🌟

बिड : बिड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहे. आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर अंगावर शहारे आणणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला. त्यानंतर गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी शुक्रवारी सविस्तर उत्तर देईन, पण या प्रकरणात जो असेल त्यावर कारवाई होईल, कठोरात कठोर कारवाई होणार, आमचे झिरो टॉलरन्स धोरण आहे असं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी ११ वाजता विधानसभेत उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री कोणावर करणार कारवाई याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यावर हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्यांना हात घातला. यावेळी फडणवीस यांनी राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. संतोष देशमुख प्रकरणावर फडणवीस काय बोलतील याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये जी घटनी घडली यावर मी नंतर उत्तर देणार आहे. पण सर्व वसुलीबाज आहे. हे कोणाचा ना कोणाचा आसरा घेत असतात. तो देणे बंद होईल तरच महाराष्ट्राचा विकास होईल. यात आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहोत. गुंतवणूकदारांना त्रास दिला तर गुंतवणूक येणार नाही. वसुलीबाज आसरा घेतात, आपण आसरा दिला नाही तर महाराष्ट्र पुढे जाईल. जो असेल त्यावर कारवाई होईल, कठोरात कठोर कारवाई होणार, आमचे झिरो टॉलरन्स धोरण आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. दरम्यान, बीड मुद्यावरून विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही आमदार आक्रमक झाले आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या