🌟पुण्यात वाघोलीच्या केसनंद परिसरात भिषण अपघात : मद्यधुंद डम्पर चालकाने नऊ जणांना चिरडले....!


🌟अपघातातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू🌟

पुणे : पुण्यात वाघोलीच्या केसनंद परिसरात एक अतिशय भीषण अपघात झाला. या अपघातात डम्परने तब्बल नऊ जणांना चिरडले. या अपघातात दोन बालकांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील डम्पर चालकाचे नाव गजानन शंकर तोट्रे, (२६ वर्षे) राहणार नांदेड आहे. दारूच्या नशेत तो डम्पर चालवत असल्याचा आरोप आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी हे मजूर अमरावतीहून पुण्यात दाखल झाले होते.

 मात्र,पुण्यात यायला उशीर झाल्याने सर्वजण फूटपाथवर झोपले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास डम्पर चालकाने नऊ जणांना चिरडले. या अपघातात दोन बालकांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेबद्दल बोलताना शिरूरचे आ. माऊली कटके यांनी म्हटले की, मुळात म्हणजे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. रांजणगावात अनेक कँमन्या असल्याने तिथे कामगार मोठ्या प्रमाणात येतात. वाघोली परिसरात वाहतूक कोडींची मोठी समस्या आहे रस्त्याची सुधारणा व्हायला पाहिजे. याबद्दल मी विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या