🌟ज्येष्ठ व अनुभवी पत्रकारांनी अधिस्विकृतीसाठी अर्ज करावेत.......!


🌟मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विश्वस्त किरण नाईक यांचे आवाहन🌟 

✍️ मोहन चौकेकर     

मुंबई- मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्यासह ५ पदाधिकारी राज्य अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आम्ही आपणास आवाहन करीत आहोत की, जिल्ह्य़ात नियमित छापील स्वरूपात प्रसिद्ध होणाऱ्या  दैनिकात सध्या उपसंपादकासहित कार्यरत असलेल्या सर्व पत्रकारांनी ५० वर्षे पूर्ण आणि पत्रकारितेत २० वर्षे अनुभवाच्या कागदपत्रांसहित विद्यमान संपादकांचे पत्र घेऊन वरिष्ठ पत्रकार या श्रेणीत अधिस्वीकृती पत्रिकेचा अर्ज जिल्हा माहिती कार्यालयात दाखल करावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी केले आहे. 

किरण नाईक यांनी पुढे असे म्हटले आहे की,   वरिष्ठ पत्रकार श्रेणी ही स्वतंत्र आहे, याचा आणि दैनिकाच्या खपानुसार मिळणाऱ्या अधिस्वीकृती पत्रिका कोट्याचा काहीच संबंध नाही.  तसेच वरिष्ठ पत्रकार यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी माहिती कार्यालयात जाऊन अधिस्वीकृतीचा अर्ज घेऊन अर्जाच्या वरील भागात वरिष्ठ पत्रकार (५०/२०) असे लिहावे, आणि अर्ज सादर करावा. जिल्हाध्यक्ष व  तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा/ तालुका कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी  दैनिकातील अधिकाधिक  पत्रकारांना ही माहिती  द्यावी असे आवाहन करीत जिल्हास्तरावरील अधिकाधिक पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळावी यासाठी मराठी पत्रकार परिषद प्रयत्न करीत आहे. असेही विश्वस्त किरण नाईक यांनी नमूद केले. काही अडचण अथवा मार्गदर्शन हवे असल्यास, किरण नाईक, विश्वस्त (9820784547) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या