🌟परभणी शहरासह परिसरातील व्यापार्‍यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा....!


🌟आमदार मेघनाताई बोर्डीकर यांची मागणी : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनाला घातले साकडे🌟


परभणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची विटंबनेची घटना निश्‍चितच दुर्देवी आहे त्या घटनेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी आरोपीं विरोधात प्रशासनाने कठोरात कठोर भूमिका घ्यावी त्याचबरोबर काल बुधवार दि.११ डिसेंबर २०२४ रोजी काही लोकांनी व्यापार पेठांमधून केलेल्या दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनेत मोठा तडाखा बसलेल्या व्यापार्‍यांच्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत तसेच तोडफोड व जाळपोळ करणार्‍या समाजकंटकांवर लवकरात लवकर ओळख पटवून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची प्रत्यक्ष भेट देऊन केली आहे.

              आमदार बोर्डीकर यांनी काल बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची प्रत्यक्ष भेट घेत प्रशासनाने केलेल्या संपूर्ण कारवाईची माहिती घेतली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्याशी बोलतांना सांगितले की आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता यापुढे सर्वांनी शांतता आणि संयम राखावा असे देखील जिल्हाधिकारी गावडे यांनी आवाहन केले आहे यावेळी आमदार बोर्डीकर यांनी नुकसानग्रस्त व्यापार्‍यांचे तात्काळ पंचनामे करावेत, वेगवेगळ्या घटनांमधील समाजकंटकांची ओळख पटवून गुन्हे दाखल करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील देशमुख,रितेश जैन,माजी नगरसेविका सौ. मंगल मुदगलकर, राहुल कनकदंडे, सुशील शर्मा आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या