🌟पुर्णेतील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळा...!


🌟या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता उद्या सोमवार दि.१६ डिसेंबर रोजी महाआरतीने होणार🌟


पुर्णा (दि.१५ डिसेंबर २०२४) - पुर्णा शहरातील अमृतनगर परिसरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे श्री दत्त जयंती निम्मीत दि.०९ डिसेंबर २०२४ पासून अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळ्याला थाटात सुरुवात झाली चालू आहे  यामध्ये विविध सेवेचे याग-हवन, श्री गुरुचरित्र सामूहिक पारायण व विविध प्रकारच्या आध्यात्मिक सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळ्या अंतर्गत आज रविवार दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३९ वाजता श्री दत्त जयंती उत्सव महाआरती सहित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री दत्तजन्म उत्सवासाठी पुर्णा शहरासह पंचक्रोशीतील सेवेकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता उद्या सोमवार दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता महाआरतीने होणार आहे.

 सप्ताह सांगता सोहळ्याला देखील मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व सेवेकरी व भाविक यांनी नियोजन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या