🌟महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करणार 'विमा सखी' योजना🌟
नवी दिल्ली :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आता नवीन योजना आणत आहेत. पंतप्रधान मोदी यासाठी विमा सखी योजनेचा शुभारंभ करणार आहेत आज सोमवार दि.०९ डिसेंबर रोजी हरियाणामधील पानीपतमध्ये पंतप्रधान मोदी विमा सखी योजनेची सुरुवात करतील.
या योजनेत भारतीय जीवन विमा निगमची महत्त्वाची भूमिका राहील. विमा सखी योजने अंतर्गत महिलांना मासिक वेतनही दिले जाईल. भारतीय जीवन विमा निगमचा हा उपक्रम १८ ते ७० वर्षाच्या महिलांना सशक्त बनवण्यासाठी आहे. हा उपक्रम त्या महिलांसाठी आहे, ज्या दहावी पास आहेत. आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पहिले तीन वर्ष विशेष प्रशिक्षण आणि मानधन दिलं जाईल.या योजनेअंतर्गत महिलांना विमा पॉलिसी विक्रीचे प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्या आपल्या उत्पन्नात वाढ करतील आणि समाजात आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्यात ३५ हजार महिलांचा समावेश केला जाणार आहे......
0 टिप्पण्या