🌟पुसद येथे युवा ग्रामिण पत्रकार संघाची विशेष नियुक्ती बैठक संपन्न.....!


🌟जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती🌟

फुलचंद भगत

वाशिम:- दि.19 डिसेंबर 2024 रोजी युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे यांच्या अध्यक्षते खाली शासकीय विश्रामगृह पुसद येथे एक विशेष बैठक संपन्न झाली यात कुलदीप सुरोशे यांना नवनियुक्त पुसद तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली आहे. ही नियुक्ती युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या आदेशानुसार व युवा ग्रामिण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षेतेखाली घेण्यात आली.

 या बैठकीला जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे युवा ग्रामिण पत्रकार संघटनेचे पदधिकारी तालुका अध्यक्ष कुलदिप सुरोशे तालूका उपाध्यक्ष विनोद कांबळे  शहराध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर शहर उपाध्यक्ष मारोतराव कांबळे तालुका सचिव सुर्यकांत राठोड प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ कदम सदस्य अनिल पवार हे उपस्थित होते. कुलदिप सुरोशे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व तालुक्यात सुपरिचीत असल्यामुळे यांचे संघटनेला मोलाचे योगदान लाभले व त्यांच्या मनमिळावू स्वभाव तसेच प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारे असल्यामुळे हि बाब संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी दखल घेवुन कुलदिप सुरोशे यांना पुसद तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या