🌟परभणी जिल्ह्यात प्रशासकीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक दिन जणजागरण पंधरवाडा म्हणून साजरा करण्याची मागणी...!


(राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण पंधरवाडा साजरा करण्याच्या मागणीचे निवेदन देतान पदाधिकारी

🌟सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांना परभणी जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी🌟

परभणी (दि.१४ डिसेंबर २०२४) - अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी शाखेच्या वतीने सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांना राष्ट्रीय ग्राहक दिन जणजागरण पंधरवाडा विविध ठिकाणी साजरा करण्यासाठी आज शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी मागणीचे निवेदन देण्यात आले.

        परभणी जिल्ह्यातील तालुक्यासह शहरातील दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २४  डिसेंबर २०२४ या दिवशी "राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त" ग्राहक जागरण पंधरवाडा साजरा करण्यात यावा या निमित्ताने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले १५ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यान "ग्राहक जागरण पंधरवाडा" ग्राहक दिन साजरा करण्यात यावा यासाठी कॉलेज, शाळा ,वस्त्या ,उपवस्त्या ग्रामीण भागातील छोटी मोठी खेडेगाव अशा सर्व ठिकाणी ग्राहक जनजागरीचे कार्य करण्याच्या अनुषंगाने निवेदन करण्यात यावे यासाठी शहरातील व तालुक्यातील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तसेच ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पथनाट्य, निबंध स्पर्धा ,महिला मंडळ ,विविध स्पर्धा, शेतकरी मेळावे अशा उपक्रमाद्वारे व्यापक जनसंपर्क करून ग्राहक जनजागरणाचे कार्य करण्यासाठी संबंधित यंत्रणाना  सूचना देण्यात याव्यात ग्राहक संरक्षण कायदा अन्नसुरक्षेच्या विविध माहिती ग्राहकांना पुरवणे कुटुंबावर उपभोगवादाचा प्रभाव दिशाभूल करणारी जाहिरात सायबर फसवणूक गुन्हे आणि डिजिटल अटल याबद्दल ग्राहकांना माहिती देणे वैद्यमापनशास्त्र अन्न व औषध प्रशासन या संबंधित जनजागृत करण्यासाठी सहायक जिल्हा पुरावठा विलास मुसळे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर  जिल्हा ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे संदीप चव्हाण रहीम भाई, सोपान टोले, भानुदास शिंदे, आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या