🌟या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते🌟
वाशिम :- मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम वनोजा येथे प्रकल्प संचालक आत्मा वाशिम व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांचे वतीने संत्रा पिकावरील जिल्हास्तरीय पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थनी मुखमाले सरपंच वनोजा तसेच मंगरुळपीर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे होते डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.योगेश इंगळे यांनी संत्रा पिकाचे नियोजन व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.कृषी विज्ञान केंद्र करडा ता.रिसोड येथील संत्रा शास्त्रज्ञ निवृत्ती पाटील यांनी संत्रा शेतीतील समस्या, आव्हाने व त्यावरील तोडगा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या प्रसंगी यशदीप गीरासे (कृषी विद्यावेत्ता ) नेटाफिम इरिगेशन यांनीही संत्रा पिकास सिंचन व ताण व्यवस्थापन या विषयवार शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
संत्रा पिकातील तज्ञ व प्रगतिशील शेतकरी भाऊराव व्यवहारे (मंगरूळपीर ) व नंदकिशोर गावंडे (त-हाळा) तसेच कृषी अधिकारी, विलास वाघ (रिसोड) रवींद्र जटाळे कृषी अधिकारी (कारंजा) यांनीही मार्गदर्शन केले.संत्रा हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असल्याने जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक शेतकरी बंधू या कार्यक्रमास उपस्थित होते.
वाशीम - मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार श्याम खोडे यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करून शेतकरी वर्गाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्राधान्याने करणार असल्याचे प्रतिपादन केले.या परिसंवाद दरम्यान आमदार शाम खोडे यांनी गोपाल देवळे या संत्रा उत्पादक शेतकरी यांचे संत्रा बागेस भेट देवून माहिती घेतली.
परिसंवाद नंतर सर्व शेतकरी बांधवांनी शिवार फेरी करून वनोजा गावातील संत्रा बागांची माहिती जाणून घेतली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजयता सुर्वे व वैभव इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल हीसेकर कृषी सहायक यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनोजा गावातील शेतकरी व तालुका कृषी अधिकारी मंगरूळपीर येथील कर्मचारी अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या