🌟नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील कहाळा येथील चंपाषष्ठी उत्सवाला प्रचंड प्रतिसाद🌟
नांदेड/कहाळा :- सर्वसामान्य जीव हा व्यवहार करताना देवाजवळ काहीतरी मागतो. नवस करतो.काहीतरी मिळावे याची अपेक्षा करतो. परंतु वारकऱ्यांची भक्ती ही निष्काम भक्ती आहे. पंढरीच्या पांडुरंगाची वारी करणाऱ्या वारकऱ्यांची वारीही निष्काम वारी असते. या वारीतून वारकरी देवाकडे काहीच मागत नाहीत .परंतु वारकऱ्यांना देव सर्व माञ सर्व काही देतो. असे प्रतिपादन प्रज्ञाचक्षु भागवताचार्य हभप.मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत महाराज संस्थानात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या चंपाषष्ठी उत्सवातील दुसऱ्या दिवशीच्या कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. ह भ प जाटदेवळेकर महाराज पुढे म्हणाले, देवाला आपण सर्व समर्पण करावे जशी गंगा ही समुद्राला मिळून सर्वस्व अर्पण करते. तसे आपले जीवन भगवंत आणि गुरु महाराजांच्या चरणी अर्पण करावे. देवाशी व्यवहार करू नये. निष्काम भक्ती करावी. सर्व संतांनी आपल्या जीवनात निष्काम भक्तीच केली आहे. आजही ते संत आजरामर झाले आहेत. परमार्थाचा भार देवावर घालावा. दुसऱ्याचा द्वेष मनात ठेवू नये. असे सांगून जे लोक हलकट आहेत. त्यांचे विचार हलकट आहेत. अशा हलकट विचारांचे लोक दुसऱ्यांचा नाश पाहतात. परंतु देव तसे करत नाही. संसार ही माया आहे. प्रपंचाला कारणीभूत असलेले सर्व विकार नष्ट करण्यासाठी भगवंताची भक्ती करणे गरजेचे आहे. धर्माच्या मार्गाने चालावे. अधर्मी लोकांपासून दूर राहावे. संसारातील प्रत्येक माणूस हा अपराधच करतो. परंतु संत कधीच अपराध करीत नाही. असेही त्यांनी सांगितले. आपल्या कीर्तनातून ह भ प जाटदेवळेकर महाराज यांनी परमार्थ कसा करावा. हे संत जनाबाईंच्या चरित्र आख्यानातून सांगितले आहे.
याप्रसंगी गुरुवर्य नीळकंठ महाराज कहाळेकर, डॉ. धनंजय महाराज कहाळेकर, किरण महाराज कहाळेकर, वेदांत महाराज कहाळेकर, ह भ प मधुसूदन महाराज कापसीकर, सूर्यकांत बोरलेपवार, शिवानंद वट्टमवार, नरेंद्र येरावार ,रमेश चिद्रावार, सूर्यकांत गुंडाळे, गायक हभप विष्णू महाराज तांदळीकर, श्याम महाराज देसाई, बालाजी रुईकर, बालाजी मामा लालवंडीकर, मृदंगाचार्य विश्वेश्वर महाराज कोलंबीकर, गोविंद काशेटवार, माधव आलसटवार, बालाजी आलसटवार, जयराम गाडे, योगेश माने, दतराम मोदलवाड, संतोष मोदलवाड, काशीनाथ माने, रामकृष्ण महाराज वझूरकर, नितीन महाराज कुलकर्णी मरवाळीकर, पांडुरंग चंचलवाड, पांडुरंग काईतवाड, मारोती चलकेवाड, संजय पोटेवाड, विठ्ठल मोदलवाड, अनिरुद्ध पोटेवाड, संदिप मोदलवाड, उत्तम गाडे, रामराव गाडे, दुर्गादास गुरू अंबुलगेकर, पांडु महाराज बरबडेकर, उदय गुरू किवळेकर, कृष्णा महाराज औढेकर, अनिल महाराज, ओंकार गुरू कुलकर्णी,अनंत मामा शिराढोणकर आदीची उपस्थिती होती.......
0 टिप्पण्या