🌟रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार राहुल पाटील,हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांचे मानले आभार🌟
परभणी (दि.०५ डिसेंबर २०२४) : परभणी-पाथरी रस्त्यावरील आ. डॉ.राहुल पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका ५५ वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
शहरातील रहिवासी असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला पोटदुखीचा अनेक दिवसांपासून त्रास होता. या त्रासामुळे हा रुग्ण त्रस्त होता, हा रुग्ण आर.पी. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. हॉस्पिटलचे शल्यचिकीत्सक डॉ. अमीर तडवी यांनी रुग्णाची तपासणी करून त्याच्या पोट दुखीच्या निदानासाठी काही चाचण्या केल्या. त्यातील अहवालानुसार पोट फुगून पोटातील घाण पाण्याचा संसर्ग अधिक होत होता, त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने डॉ. तडवी यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या आजारा संदर्भात माहिती दिली व त्यांच्या संमतीने डॉ.अमीर तडवी, भूलतज्ञ डॉ. श्रुती सहारे तसेच शस्त्रक्रिया गृहातील कर्मचारी संध्या आळणे, किशोर नवले, पवन यांच्या मदतीने शस्त्रक्रिया करून अडीच लिटर घाण पाणी काढून रुग्णाचा जीव वाचवला.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला दहाव्या दिवशी सुट्टी देण्यात आली. अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ शस्त्रक्रिया परभणीत आरपी हॉस्पिटलमध्ये झाली, यामुळे नातेवाईकांचा अवाढव्य खर्च वाचला आणि त्यांची गैरसोय देखील टळली. रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार राहुल पाटील,हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांचे आभार मानले.....
0 टिप्पण्या