🌟ख्रिश्चन धर्मीय बांधवांनी बायबल वाचन व प्रार्थना म्हणून एकमेकांना मेरी ख्रिसमस म्हणत शुभेच्छा दिल्या🌟
पुर्णा (दि.२५ डिसेंबर २०२४) पुर्णा शहरातील मेथाडिस्ट चर्च व पास्का चर्च मध्ये आज बुधवार दि.२५ डिसेंबर रोजी नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन धर्मीय बांधवांनी बायबल वाचन व प्रार्थना म्हणून एकमेकांना मेरी ख्रिसमस म्हणत शुभेच्छा देत नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
मेथाडिस्ट चर्च मध्ये पोस्टर कमलेश पीटर यानीं बायबल वाचुन जगात शातंता प्रस्थापित करण्यासाठी प्रार्थना करुन उपदेश केला त्याच बरोबर पास्काचर्च मध्ये फादर सुनीलकुमार यांनी प्रार्थनीय उपदेश केला. व उपस्थित लोकानां शुभेच्छा दिल्या;दोन्ही चर्च मध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध वयोगटातील मुला मुलीच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील विजेत्यांना 1जानेवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे अशी माहीती कार्यक्रमाचे संयोजक सॅमसन कांबळे यानीं पञकारानां माहीती दिली या आज रेव्हु कमलैश पीटर फादर मायकेल;पोस्टर सुनीलकुमार, जाॅन पुरकुरे डेव्हिड जेम्स डेव्हिड धबाले ,साई नीमालु, साहेब पैलवाड, बैजामीन पुरकुरे वर्षा पडोले सुधा पुलकुरे ,दायना पुलकुरे आशिष पडोले आदि उपस्थित होते.....
0 टिप्पण्या