🌟नांदेड येथील जेष्ठ पत्रकार तथा समाजसेवी रविंद्रसिंघ मोदी यांची मागणी🌟
भारत देशाला कठिण आर्थिक अडचणीतून सावरून विश्वस्तरावर महाशक्ती म्हणून प्रस्थापित करणारे तत्कालीन अर्थमंत्री आणी वर्ष 2004 ते 2015 पर्यंत दहा वर्षें सतत पंतप्रधान पदावर नवलौकिक मिळवणारे दिवंगत डॉ मनमोहनसिंघ हे तसे नोबल पुरस्काराचे मानकरी होते. भारत देशाने वेळीच त्यासाठी प्रयत्न केले असते तर ते त्यांना मिळाले ही असते. दुसरीकडे डॉ मनमोहनसिंघ हे देशाचे सर्वोच्च बहुमानासाठी पात्र होते. त्यांना हयात असतांना भारतरत्न बहुमान देखील मिळायला हवे होते. अशी भावना वरिष्ठ पत्रकार स. रविंद्रसिंघ मोदी यांनी व्यक्त केली आहे.
डॉ मनमोहनसिंघ यांचे गुरुवारी रात्री देहावसान झाले. यामुळे देशभरात शोक संवेदना विस्तारित झाली. शिवाय देशातील आणी विदेशातील शीख समाजात देखील वरील घटनेने दुःखाचे सावट पसरले. नांदेडच्या शीख समाजात डॉ मनमोहनसिंघ यांच्या बद्दल एक विशेष आदर आहे. नांदेडच्या विकासासाठी त्यांनी गुरुतागद्दी विकास योजना आणी जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून भरीव मदत केली होती.डॉ मनमोहनसिंघ हे भारतीय रिजर्व बँकेचे गवर्नर म्हणून अनेक वर्षें कार्यरत होते. ते सूक्ष्म आणी समग्र अर्थशास्त्र विषयाचे विश्वस्तरीय प्राध्यापक आणी अभ्यासक होते. अमेरिका येथील विद्यापिठात त्यांना अर्थशस्त्रासंबंधी नेहमी निमंत्रण असायचे. त्यांनी सूचवलेल्या सुधाराचे मंत्र आज देखील उदाहरण दिले जाते.
एकेकाळी देशाचे सोने विदेशी बँकेत तारण म्हणून जमा करण्यात आले होते. देशाच्या शासकीय तिजोरीत फक्त चाळीस दिवस पूरेल एवढाच पैसा शिल्ल्क होता. प्रचंड अशी मंदी ओलावढी होती. जीडीपी दर खाली कोसळला होता अशा संकटकाळात डॉ मनमोहनसिंग यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून जवाबदारी स्वीकारली आणी संकटकालीन आर्थिक परिस्थितिवर मात करून देशाला सावरण्याचे अतुलनीय असे कार्य केले. नंतर त्यांनी पंतप्रधान पदावर अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या. रोजगार हमी योजनेची कल्पना त्यांचीच होती. डॉ मनमोहनसिंग यांच्या सारखा विद्वान व्यक्ति जर इतर कोणत्या देशात जन्मला असता तर त्यांना त्या देशाचा सर्वोच्च बहुमान केव्हाच मिळाला असता. कदाचित नोबल पुरस्कार देखील मिळाला असता. भारत देशाने त्यांच्या विधवत्तेचे स्मरण ठेवून आणी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यांची नोंद घेऊन देशाचा सर्वोच्च बहुमान 'भारतरत्न' उपाधि त्यांना घोषित करावी अशी भावना स. रविंद्रसिंघमोदी यांनी शोकसंदेशानिम्मित केली आहे.......
0 टिप्पण्या