🌟यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सुर्यवंशी कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले व सरकार त्यांना न्याय देईल अशी ग्वाही दिली🌟
परभणी :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी रात्री ०७.३० वाजता परभणीत दाखल झाल्याबरोबर नवा मोंढा येथील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुर्यवंशी कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले व सरकार त्यांना न्याय देईल अशी ग्वाही दिली त्यावेळी आमदार राजेश विटेकर आमदार रत्नाकर गुट्टे राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष प्रताप देशमुख तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे व अन्य अधिकारी उपस्थित होते......
0 टिप्पण्या