🌟ज्येष्ठ बौध्द भिक्खुंच्या उपस्थितीत भेसज्ज बुध्द विहार भूमीपूजन सोहळा🌟
परभणी (दि.१४ डिसेंबर २०२४) :- परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील रायखेडा येथे भेसज्ज बुध्द विहार भूमिपूजन सोहळ्या निमित्त उद्या रविवार दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी एक दिवसीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेला महाराष्ट्रातील मुंबई, अहमदनगर, मनमाड, हिंगोली, पुणे आणि तेलंगणा येथून ज्येष्ठ बौध्द भिक्खु आणि भिक्खुनी धम्म प्रवचनासाठी येणार आहेत. ही धम्म परिषद दोन सत्रात संपन्न होणार असून पहिल्या सत्रात बौद्ध भिकूंची धम्मदेशना आणि मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसर्या सत्रात महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका भाग्यश्री इंगळे यांच्या समाज प्रबोधनपर बुध्द-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने या परिषदेस उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, जिंतूर चारठाणा हायवेवर दोन एक्कर परीसरात रायखेडा बुद्धभुमी वसलेली आहे. गेल्या वीस वर्षांपासून याठिकाणी बौध्द धम्माच्या प्रतीकांची स्थापना करण्यात आली आहे. सद्य स्थितीत या ठिकाणी भिक्खुंची धम्मकुटी असून अनेक उपासक उपासिका भेटी देत असतात. भविष्यात येथे महाविहार निर्मिती करण्याचा संकल्प आहे......
0 टिप्पण्या