🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟वरिष्ठांकडून तो निरोप अन् चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली हिंट; मंत्रिमंडळातून पत्ता कट,सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट🌟

✍️ मोहन चौकेकर

💫उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित ; बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, देवेंद्र फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीचा व्हिडिओ समोर, सदिच्छा भेट असल्याचं उद्धव ठाकरेंकडून स्पष्टीकरण 

💫वाह रे,दादाचा वादा,कसला वादा अन् कसला दादा ; छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवर संताप,नाशिकमध्ये समर्थकांसमोर सगळंच काढलं ; छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणं योग्य नव्हतं ; आ.अनिल पाटलांची प्रतिक्रिया 

💫छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली ; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले, पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का ? ; छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात असतात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली राजकीय गुगली 

💫भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचे कार्यकर्तेही बाहेर पडले, चंद्रपुरात घडामोडींना वेग ; भाजप कार्यकर्ते दिल्लीपर्यंत पायी यात्रा काढणार ; नितीन गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनंगटीवारांची दिल्लीवारी; जे.पी.नड्डा यांच्या भेटीत नव्या जबाबदारीची धुरा मिळण्याची शक्यता 

💫भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी ; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती, बुधवारी अर्ज भरण्याची शक्यता ; खातेवाटप अन् नेत्यांच्या नाराजीवर उदय सामंतांचं मोठं भाष्य; म्हणाले, 'खातेवाटपात कुठलाही तिढा नाही', एकत्र बसून दोन दिवसांमध्ये निर्णय घेतील

💫निलेश राणे सभागृहात आक्रमक,देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटांत शांत केलं,म्हणाले त्यांना माहिती नसेल की इथं अशा प्रश्नांवर लगेच उत्तरं दिली जात नाहीत ; गोपीचंद पडळकरांच्या मागणीला पहिलं यश, भाजपची पहिली अ‍ॅक्शन, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटलांना नोटीस धाडली! 

💫मनोज जरांगे २५ जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले ''माझा कदाचित यात शेवटही होऊ शकतो'' ; छगन भुजबळ कुठेही जाणार नाही, ते दुसरीकडे गेले की फडणवीस साहेब त्याला जेलमध्ये टाकतील''; छगन भुजबळांच्या नाराजीवर मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल 

💫मी कोणत्या मंत्र्याबद्दल बोलत नाही, वाल्मिक कराडबद्दल बोलतोय, त्याला अटक झालीच पाहिजे: रोहित पवार यांची मागणी ; खासदार बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं, राष्ट्रवादीच्या आमदारांची घोषणाबाजी ; गंभीर आरोपांची राळ, पोलीस अधिकारी व PSI बदलण्याची मागणी 

💫आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर ; पोलिसांना सगळंच माहिती होतं का असा प्रश्न उपस्थित ; संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार 

💫गाबा कसोटीत आकाशदीपचा 'तो' चौकार अन् टीम इंडियावरील फॉलोऑनचा धोका टळला, राहुल-जडेजाने वाचवली टीम इंडियाची लाज ; आकाशदीपच्या एका चौकाराने ड्रेसिंग रुममध्ये चैतन्य संचारलं, विराट नाचत गंभीरकडे पोहोचला, रोहितनेही टाळ्या वाजवल्या, VIDEO समोर 

💫वरिष्ठांकडून तो निरोप अन् चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली हिंट; मंत्रिमंडळातून पत्ता कट,सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट

💫सुषमा अंधारे चिमुरड्या लेकीसोबत असताना विमानतळावर 'त्या' व्यक्तीने गाठलं, जीवे मारण्याची धमकी; नागपूर एअरपोर्टवरील प्रकार ट्विटरवरुन मुख्यमंत्र्‍यांना सांगितला 

💫शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं होणार 'थ्रीडी स्कॅनिंग'; शुक्रवारी दुपारी मंदिर 3 तास दर्शनासाठी बंद

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या