🌟शहरातील विविध प्रभागांत सुरू असलेल्या शासकीय विकासकामांची माहिती देणारे फलक लावण्याचे आदेश जारी🌟
पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुर्णा नगर परिषदे अंतर्गत राज्य शासनासह केंद्र शासनाकडून देखील कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाला या कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून शहरातील विविध प्रभागांमध्ये बोगस व निकृष्ट दर्जाच्या विकासकामांच्या मालिकेला सुरुवात झाली या विकासकामांना तांत्रिक मंजुरी (टेक्निकल शॅक्शन) देतेवेळी संबंधित नगर परिषद मुख्याधिकारी व नगर परिषद नगर अभियंता प्रशासकीय मान्यतेसह तांत्रिक मान्यता मिळवतेवेळी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिवण प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळवत असल्याने शहरातील अनेक प्रभागांमध्ये वर्ष/दोन वर्षांपूर्वी झालेल्या सिमेंट रोडवर तर काही ठिकाणी निर्मनुष्य वसाहतींमध्ये देखील कोट्यवधी रुपयांची बोगस निकृष्ट दर्जाची विकासकाम होतांना पाहायला मिळत आहे.
शासकीय नियमानुसार प्रत्येक विकासकामांच्या ठिकाणी संबंधित विकासकाम कोणत्या शासकीय योजनांतर्गत केले जात आहे व किती रुपयांच्या विकासनिधीतून केले जात आहे संबंधित विकासकामाचे अधिकृत गुत्तेदार कोण यासह संबंधित विकासकामाचा संपूर्ण तपशील दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक असताना पुर्णा शहरातील विविध प्रभागांमध्ये पुर्वी झालेल्या व सद्या सुरू असलेल्या कोणत्याही रुपयांच्या विकासमांचे गुत्तेदार जाणीवपूर्वक फलक न लावता निकृष्ट व बोगस विकाकामांचा सपाटा लावून कोट्यवधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची विल्हेवाट लावत असल्याच्या तक्रारी वाढल्याने व नगर परिषद प्रशासनाकडे नागरिकांकडून माहिती अधिकार अर्जांतर्गत माहिती मागण्याचे प्रमाणही वाढल्यामुळे नर परिषद मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी पुर्णा नगर परिषद अंतर्गत विविध शासकीय विकास कामाच्या ठिकाणी नाव फलक लावण्या संदर्भात कोट्यवधी रुपयांची शासकीय विकासकाम करणाऱ्या यश कंन्स्ट्रक्शन परभणी,रॉयल कंन्स्ट्रक्शन पूर्णा,गुरुकृपा कंन्स्ट्रक्शन पूर्णा,सोमेश कंन्स्ट्रक्शन पूर्णा,जि.एम कंन्स्ट्रक्शन पूर्णा,महाराष्ट्र कंन्स्ट्रक्शन पूर्णा,सुमन कंन्स्ट्रक्शन पूर्णा,गजानन शिवराज पाथरकर पुर्णा,आयान कंन्स्ट्रक्शन, पूर्णा,पॉवर मल्टीसर्विस छत्रपती संभाजी नगर,स्पीड फायर सर्विस परभणी या जवळपास अकरा शासकीय बांधकाम गुत्तेदारांना कार्यालयाचे कार्यरंभ आदेश जा.क्र./नपपु.-२/५७५०/२०२४ अंतर्गत आदेश जारी केले असून या आदेशाची यातील एकाही बांधकाम गुत्तेदार कंपनीने अंमलबजावणी केली नसल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या सर्वच बांधकाम गुत्तेदार कंपन्यांचा काळ्या यादीत समावेश करुन पुर्णा शहरातील विविध प्रभागांमध्ये झालेल्या व सद्या सुरु असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निकृष्ट व बोगस विकासकामांची चौकशी करुन संबंधित गुत्तेदारांवर रितसर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे......
0 टिप्पण्या