🌟महावितरण कंपनीला दिले 10,750/- रुपयांचे वीज बिल रद्द करून 7000 नुकानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश🌟
फुलचंद भगत
वाशिम :- वाशिम येथील दाताचे डॉक्टर डॉ ओबेरॉय यांना जुलै 2023 मध्ये वीज बिलात इतर आकार म्हणून 10,750/- म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नमूद केले होते. त्याबाबत डॉ ओबेरॉय यांनी विचारपूस केली असता त्यांना कधीही योग्य ते उत्तर मिळाले नाही म्हणून त्यांनी ऍड भन्साळी मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली त्याला सुद्धा कोणतेही उत्तर दिले नाही.
म्हणून शेवटी ऍड पवनकुमार भन्साळी यांच्या मार्फत वाशिम जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली या मध्ये विद्युत वितरण कंपनीने प्रस्तुत तक्रार खोटी असून जुने बाकी असल्यामुळे सदरची रक्कम बिलात नमूद केली असल्याचे कथन केले. विद्यमान जिल्हा ग्राहक आयोगाने तक्रारदार व विरुद्धपक्ष यांचे युक्तिवाद ऐकून निकाल दिला की तक्रारदार यांना जुलै 2023 चे बिल मधे इतर आकार मध्ये नमूद रक्कम रु. 10750 रक्कम दर्शवून दिलेले वीज बिल रद्द करून नवीन सुधारित बिल देण्याचे आदेश केले आहे तसेच रक्कम रू. 7,000 नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश आयोगाने दिले आहे सदरचा निकाल हा वाशिम जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष वैशाली आर. गावंडे , सदस्य नागेश बी. उबाळे यांनी दिलेला आहे.....
0 टिप्पण्या