🌟शहानिशा न करता पंधराशे रुपये दिले,आता पैसे परत मागू नका,लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल🌟
✍️ मोहन चौकेकर
* रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केंद्र सरकारने केली घोषणा
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला, उदय सामंतांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानाने मंजूर ; विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुद्दा मांडणार, चांगला विरोधी पक्ष सुदृढ लोकशाहीचं लक्षण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
* विरोधी बाकांवरील संख्या चिंताजनक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिल्याच भाषणात तुफान फटकेबाजी ; लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय? अजित पवारांची जोरदार बॅटिंग, विरोधकांना म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय
* विधानसभा अध्यक्षेपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड ; राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाचे सर्व आमदार सभागृहामध्ये अनुपस्थित
* राज्य मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करुन मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढणार
* जयंत पाटील म्हणाले, आपला योग्य वेळी योग्य निर्णय, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसादच देत नाही, अधिवेशनामध्ये मिश्कील टोलेबाजी ; जयंत पाटील लवकरच अजितदादा पवारांसोबत असतील, योग्य वेळी निर्णय घेतील, अमोल मिटकरींचा दावा
* आर.आर.आबां पाटील लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले ; अमृताहूनी गोड,नाम तुझे देवा...रोहित पाटलांनी गोड गोड बोलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करून टाकली गुगली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हसू अनावर
* शहानिशा न करता पंधराशे रुपये दिले,आता पैसे परत मागू नका, लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात छाननी होणार नाही, अदिती तटकरेंची माहिती
* बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी ठराव घ्यावा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र ; बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा थांबवल्यानंतर आता दोन माजी मंत्री सीमा भागात जाणार*
* राज्यपाल करतो सांगून तामिळनाडूतील व्यक्तीला 5 कोटींना गंडवले, गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकच्या निरंजन कुलकर्णीला ठोठावली पोलीस कोठडी
* डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला, आक्रमक हातवारे केल्यामुळे आयसीसीकडून 20 टक्के मानधन कपात ; पॉईंट टेबलमध्ये 24 तासांत मोठा उलटफेर, दक्षिण आफ्रिकेने घेतली पहिल्या स्थानावर झेप, टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर कायम
✍️ मोहन चौकेकर*
0 टिप्पण्या