🌟भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडविण्याची मोठी संधी.....!


🌟सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना प्राचार्या डॉ.जया बंगाळे यांचे प्रतिपादन🌟 

परभणी (दि.०५ डिसेंबर २०२४) : भारतीय अर्थव्यवस्थेचा कृषी क्षेत्र हा कणा असून विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात आपले भविष्य घडविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे असे प्रतिपादन सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तथा प्राचार्या डॉ.जया बंगाळे यांनी केले.

           वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. भगवान आसेवार यांच्या निर्देशानुसार येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत  3 डिसेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा जन्मदिवस कृषी शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

          संपूर्ण महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठापैकी एक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रम  असून या  महाविद्यालयातील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नोकरी व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. नीता गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अ.भा.स.सं.प्र.-कृषिरत महिला द्वारे शेतीतील श्रम कमी करण्यासाठी विकसित विविध तंत्रज्ञान व अवजारे तसेच सामुदायिक  विज्ञान महाविद्यालयातील विविध विभागाच्या बाबतीत सखोल माहिती देऊन येथील शिक्षणामुळे नोकरी, व्यवसाय उपलब्ध असणार्‍या विविध क्षेत्रांची विशेषत: दवाखाने व व्यायामशाळेत आहारतज्ञ, बालविकास अधिकारी, समुपदेशक, प्राध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक, प्रशिक्षक, इंटेरीयर डिझायनर, हंडीक्राफ्ट मेकर, इव्हेंट मॅनेजर, फॅशन डिझायनर, बुटिक मॅनेजर, विस्तार अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, शात्रज्ञ, महिला व बाल विकास योजनेच्या विविध पदाविषयी माहिती दिली.

           शालेय विद्यार्थ्यांना  कृषी अनुषंगिक विषयांची ओळख व्हावी व कृषी क्षेत्रातील उपलब्ध संधी बाबत  विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून कृषी शिक्षण दिनाच्या निमित्ताने येथी शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या शालेय विद्यार्थ्यांची भेट सामुदायिक विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली. यावेळी  विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रदर्शनीला भेट देऊन विविध उपलब्ध तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली. तसेच महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेट देत शिक्षण आणि संशोधन कार्याबद्दल माहिती घेतली. शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे संचालक ज्ञानेश्‍वर बर्वे शालेय विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठातील महाविद्यालयास भेट देण्याची संधी देण्यात आली म्हणून आभार व्यक्त केले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर यांनी केले तर डॉ.नीता गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी डॉ. वीणा भालेराव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या