🌟परभणी जिल्ह्यातील सात तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उबदार कपड्यांचे वाटप..!


🌟होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेतर्फे स्वेटर्सचे विद्यार्थ्यांना करण्यात आले वाटप🌟 

परभणी (दि.०२ डिसेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या निवासी वसतिगृहात शिकणार्‍या व वडिलांचे छत्र हरवलेल्या २११ एकल पालक व अनाथ मुलींना थंडीपासून बचावासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेतर्फे स्वेटर्सचे वाटप करण्यात आले.

             मागील आठवड्यापासून वाढलेल्या थंडीत  जिल्ह्यात शासनाच्या के.जी.व्ही.बी. वसतिगृहात शिकणार्‍या एकल पालक व अनाथ मुलींचा थंडीपासून बचाव व्हावा म्हणून एचएआरसी संस्थेतर्फे लोकसहभागातून  ‘प्रकाशवाटा’ या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर 300  रूपये प्रति स्वेटर रक्कम लागणार असल्याने त्याबाबतचे आवाहन केले होते. त्यास दात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यातूनच केवळ 3 दिवसांत 7 तालुक्यात स्वतः जाऊन या 211 गरजू मुलींना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले.  एचएआरसी संस्थेच्या टीमने 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान  जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, आरएमएसए वसतिगृह यात पूर्णा 23, गंगाखेड 30, मानवत 33,  पाथरी  40, सेलू 28, जिंतूर 41 व परभणी 18 अशा एकूण 211 एकल पालक व अनाथ मुलींना स्वेटर्स वाटप केले.  

           हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ. आशा चांडक, प्रा. डॉ. शिवा आयथळ, राजेंद्र खापरे, अ‍ॅड. चंद्रकांत राजुरे, पद्मा भालेराव, शीतल राजुरे, विद्या राठोड, पांडुरंग पाटणकर, अंगद माडे, प्रकाश डुबे, डॉ.विष्णू राठी, पवन बंग यांनी पुढाकार घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या