🌟या कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
परभणी (दि.१६ डिसेंबर २०२४) : संयुक्त राष्ट्र संघटनेने दि.१८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय,वांशिक,धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तृत केला आहे त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती,भाषा,धर्म,परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय आयोगाने सूचना दिल्या अल्पसंख्यांक समाजातील नागरीकांनी अल्पसंख्याक हक्क दिन या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा त्यानुसार प्रत्येक वर्षी दि.१८ डिसेंबर हा दिवस जिल्हा प्रशासनाच्या वतीने "अल्पसंख्याक हक्क दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव/ माहिती करून दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने दि.१८ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे दुपारी ०१.०० वाजता "अल्पसंख्याक हक्क दिवस" साजरा करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे......
*-*-*-*-*
0 टिप्पण्या