🌟परभणी शहरातील आंदोलक भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणी मुळेच : पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर....!


🌟शाहिद सोमनाथ सुर्यवंशीच्या न्यायासाठी न्यायाची लढाई लढणार - प्रकाश आंबेडकर 

छत्रपती संभाजीनगर :- परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली होती. 

परभणी पोलिसांच्या अमानुष मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला होता मात्र पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली मयत सोमनाथ सुर्यवंशी यांचे शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण Shock following multiple injuries असे नमूद करण्यात आले आहे यावरुन विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती पण आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवला होता.

याठिकाणीही शवविच्छेदनाला उशीर होत असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले. यानंतरच्या प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

💫 प्रकाश आंबेडकर आक्रमक :-

 वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून भाष्य केले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे सोमनाथ सुर्यवंशी एक भीमसैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता होते. ते परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होते. आम्ही त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणार असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या