🌟परभणीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील संविधान प्रतिकृतीचा माथेफिरु समाजकंठकाने केला अवमान...!


🌟समाजकंटकाला प्रत्यक्षदर्शींनी घेतले ताब्यात : परभणी पोलिस प्रशासनाकडून तपास सुरु🌟

🌟कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका असे आवाहन परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाने केले आहे🌟 

परभणी (दि.१० डिसेंबर २०२४) : परभणी येथील महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा एका माथेफिरु समाजकंटकाने आज मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी सायंकाळी अवमान करण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रत्यक्षदर्शनींनी त्या माथेफिरु समाजकंटकांना तात्काळ ताब्यात घेवून यथेच्छ चोप दिला यावेळी पोलिसांनी त्या समाजकंटकाला ताब्यात घेतले आहे.

          या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणावर संतप्त नागरीक जमा झाले परंतु सुज्ञ जेष्ठ आंबेडकरी विचारवंत पदाधिकारी व नागरीकांसह परभणी जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थिती तात्काळ नियंत्रणात आणली पोलिसांनी त्या माथेफिरु समाजकंटकाची कसून चौकशी सुरु केली होती त्या दरम्यान परभणी शहरासह जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी काहीशा अफवा पसरल्या पाठोपाठ व्यापार्‍यांनी तात्काळ आपआपले व्यवसायिक प्रतिष्ठाण बंद केली.

दरम्यान संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये असे आवाहन परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाने जनतेला केले आहे.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या