🌟परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती बाबतचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न....!


🌟या प्रशिक्षणाचे उद्घाटन परभणी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.प्रशांत भोसले यांच्या हस्ते संपन्न🌟

परभणी (दि.२० डिसेंबर २०२४) :- पर्यावरणाचा समतोल,मानवी आरोग्य,जमिनीचा सजीवपणा या सर्व घटकांची जपणुक करण्यासाठी शासकीय स्तरावर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात.कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रात डॉ. पंजाबराव देशमुख नैसरर्गिक शेती मिशन हा विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, परभणी येथे दि.०९/ते १४/दरम्यान ३ प्रशिक्षण कार्यक्रमांचे नैसर्गिक शेती करण्याऱ्या गट प्रमुखांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र, परभणी चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. प्रशांत भोसले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन आत्माचे प्रकल्प संचालक श्री. दौलत चव्हाण व मा. श्री. अभिषेक घोडके, प्रकल्प उप संचालक, आत्मा, परभणी हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करताना डॉ. प्रशांत भोसले यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व व सद्य परिस्थितीत त्याची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातुन पर्यावरण, मृदा व जल संवर्धन कशाप्रकारे करता येईल याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले

 चव्हाण यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजने विषयी सविस्तर माहिती दिली. या योजनेतंर्गत वर्षनिहाय राबवयाच्या बाबी, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ, योजनेची कार्यपध्दती व कृषि विभागामार्फत हि योजना कशाप्रकारे राबविण्यात येणार आहे या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच नैसर्गिक शेतीमधुन उत्पादित होणाऱ्या शेतमालाचे मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या विशेष अभियानाची माहिती दिली.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तांत्रीक सत्रामध्ये श्री. माऊली कापसे, सेंद्रिय शेती अभ्यासक, परभणी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना कंपोस्टींग, बायो डायनामिक्स खत निर्मिती व गांडुळखत निर्मिती तसेच पेरणीसाठी पंचांगानुसार कोणते नक्षत्र योग्य आहे या बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच पेरणी करताना, किडनाशकांची फवारणी करताना कोणता कालावधी योग्य आहे याबाबत मार्गदर्शन केले. 

श्याम बोबडे सेंद्रिय शेती प्रमाणीकरण तज्ञ, छत्रपती संभाजीनगर यांनी नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण, याबाबतची मानके व शेतकऱ्यांनी याबाबतची कोणकोणती कागदपत्रे जमा करावीत तसेच पुर्व मशागत पासुन ते काढणी पर्यंत सर्व माहिती संकलीत ठेवावी व ती कशाप्रकारे संकेतस्थळावर भरावी याबाबत सविस्तर माहिती दिली अमित तुपे,शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी नैसर्गिक शेती करतांना मृदा व  जल संधारन कशा प्रकारे करावे, आपल्या शेतीची बांधबंदिस्ती, जैविक कुंपन, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे व कमीत कमी मशागत करुन जमिनीची कशी काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सत्रामध्ये . अमोल भोसले, नैसर्गिक शेती अभ्यासक, सातारा आणि  बाबासाहेब रणेर, प्रगतशील शेतकरी व नैसर्गिक शेती अभ्यासक, परभणी यांनी दहा ड्रम थेयरी मधील निविष्ठा कशा प्रकारे बनवाव्यात हे प्रात्यक्षिकासह दाखवीले. तसेच दहा ड्रम थेयरीच्या माध्यमातुन रोग व किडींचे नियंत्रण व सेंद्रिय कर्ब वाढविणे कशा प्रकारे शक्या आहे याबाबतची सवीस्तर माहिती दिली. तसेच अग्निहोत्र, हिरवळीची खते, गांडुळखत, बायोचर या बाबी नैसर्गिक शेती करतांना अत्यंत महत्वाच्या असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

 चंद्रशेखर देशमुख,कार्यक्रम सहाय्यक यांनी नैसर्गिक शेतीमधील माती समृध्द करण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर टाळून सेंद्रिय निविष्ठांचा वापर कशा प्रकारे करावा याबाबत माहिती दिली. तसेच माती परिक्षणाची गरज व महत्व विषद करुन माती परिक्षण अहवाल कश्याप्रकारे वाचावा याबाबत माहिती दिली.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अरुणा खरवडे व आभार . सवाई सिंह निठारवाल यांनी केले. प्रशिक्षण कायक्रमासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या