🌟हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली करण्याचा निर्णय🌟
बिड :- बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्या प्रकरणाला १० दिवस उलटून गेल्यानंतरही सातपैकी तीन आरोपी अजूनही फरार आहेत. तसंच या हत्या प्रकरणात अद्याप मास्टरमाईंडवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच नाही असा आरोप विविध नेत्यांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असून तपासाची कार्यकक्षा गृहविभाग ठरवणार असल्याची माहिती आहे.
हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करत आहे. त्यांना बीड पोलीसही आरोपी शोधण्यासाठी मदत करत आहेत. अधिवेशनातही हत्यासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे बीड पोलीस आरोपी शोधण्यासाठी धावपळ करत आहेत. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथक तयार करण्यात आली आहेत........
0 टिप्पण्या