🌟देशाचे स्वर्गीय पंतप्रधान जगविख्यात अर्थतज्ज्ञ सरदार डॉ.मनमोहनसिंघ यांना नांदेड येथे वाहण्यात आली श्रध्दांजली...!


🌟वारिस-ए-लाहोरी खालसा फौज ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आले होते श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन🌟

नांदेड :- भारताचे कर्तृत्ववान माजी पंतप्रधान व जगविख्यात अर्थतज्ञ स्वर्गीय सरदार डॉ.मनमोहन सिंग यांचे नुकतेच निधन झाले त्यामुळे देशाने एक अत्यंत संयमी कर्तृत्ववान आदर्श राजकारणी व जगविख्यात अर्थतज्ज्ञ गमावला अशे महान व्यक्तीमत्व असलेल्या माजी पंतप्रधान सरदार डॉ मनमोहनसिंघजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी काल रविवार दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०४.३० वाजेच्या सुमारास नांदेड येथील वारिस-ए-लाहोरी खालसा फौज ग्रुपच्या वतीने शहरातील गोविंद बाग गार्डन येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजत करण्यात आले होते.

यावेळी स.भगवंतसिंघ हजुरिया,प्राचार्य स.गुरबचनसिंघ सिलेदार,स.डॉ.जुझारसिंघ सिलेदार,ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवी स.रवींद्र सिंग मोदी,स.भिमसिंग बेलथरवाले आणि स.इंद्रजितसिंघ गडगज यांनी यावेळी समर्पक विचार व्यक्त केले या श्रध्दांजली कार्यक्रमात स.खेमसिंघ पुजारी,स.विक्रमसिंघ फौजी, जगजीवनसिंघ रिसालदार,स.दलीपसिंघ रागी,स.राजिंदर सिंघ सिद्धू,स.हरनाम सिंघ मल्होत्रा,स.हरकिशनसिंघ महंत,स.हुकम सिंघ कराबीन,स.महादीपसिंघ महंत,चंदीगडहून भेटीसाठी आलेले हरबंससिंघ वसरीकर आदी मान्यवर उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या