🌟परभणीतील संविधान विटंबनेसह सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडून गंभीर दखल...!


🌟आयोगाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.धर्मपाल मेश्राम यांनी केली तीघा पोलिस अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी🌟 

🌟अ‍ॅड.धर्मपाल मेश्राम यांनी पोलिस व महसूल यंत्रणेवर केली जोरदार टीका🌟

परभणी (दि.१८ डिसेंबर २०२४) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या तोडफोडीच्या पार्श्‍वभूमीवर उसळलेल्या हिंसक घटनांना पोलिस यंत्रणाच कारणीभूत असल्याचे मत राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सचिव (सचिव दर्जा) अ‍ॅड.धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले कायदा व सुव्यवस्था राखण्यात दिरंगाई केल्याबद्दल तीघा पोलिस अधिकार्‍यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलिस यंत्रणेने सक्तीच्या रजेवर पाठवावे असे निर्देश देखील आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.मेश्राम यांनी दिले आहेत 

              महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अ‍ॅड. मेश्राम हे मंगळवार दि.१७ डिसेंबर व आज बुधवारी दि.१८ डिसेंबर असे सतत दोन दिवस परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते या दौर्‍यातून अ‍ॅड.मेश्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले घटनास्थळाची पाहणी केली. तसेच विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाबरोबरही हितगूज केले. सर्वसामान्य नागरीकांच्याही प्रतिक्रिया ऐकून घेतल्या. त्या पाठोपाठ जिल्हाधिकारी, प्रभारी जिल्हा पोलिस अधिक्षक, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याबरोबर स्वतंत्रपणे बैठकीतून हितगुज केले. या सार्‍यांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर आज बुधवारी दुपारी त्यांनी संवाद साधला.

               यावेळी अ‍ॅड.मेश्राम यांनी ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. या घटनेत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल संवेदना व्यक्त केली दि.१० डिसेंबर रोजीच्या घडलेल्या या घटनेबद्दल आयोगास १२ डिसेंबर रोजी माहिती मिळाली १३ डिसेंबर २०२४ रोजी आयोगाद्वारे आपण जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून सविस्तर अहवाल मागविली त्या पाठोपाठ आपण दोन दिवस सुट्टीचे अपवाद लगेचच दोन दिवशीय जिल्हा दौरा केला त्यातून संविधानाच्या अवमानाची दुर्देवी घटना त्या पाठोपाठ हिंसक घटनांचा विषय समजून घेतला विषयाचे गांभीर्य ओळखले असे ते म्हणाले.

              विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याची घटना निश्‍चितच दुर्देवी आहे. त्याचबरोबर या घटने पाठोपाठ संभाव्य स्थिती ओळखून यंत्रणेद्वारे सर्वतोपरि खबरदारी घ्यावयाची गरज होती दुर्देवाने सरकारी यंत्रणेने त्या संबंधिची काळजी घेतली नाही. काही गोष्टी संयमीपणाने व संवेदनशीलपणे हाताळल्या हे खरे परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले अशी खंत अ‍ॅड.मेश्राम यांनी व्यक्त केली.

              संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाल्या पाठोपाठ संबंधित आरोपीस पकडल्यानंतर त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्यानंतर या विषयात अज्ञात शक्तींनी शिरकाव करावा,हिंसाचार घडवावा ही गोष्टच आपणास प्रामुख्याने खटकली आहे सामाजिक सलोखा जाणिवपूर्वक बिघडविण्याचा हा प्रकार संतापजनक आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हिंसा मान्य नाही त्यांचा संविधान आणि कायद्यावरच मोठा विश्‍वास होता. म्हणूनच परभणीतील या हिंसक घटना निश्‍चितच संशोधनाचा विषय आहे त्यामागे कोणत्या शक्ती होत्या आंदोलन चिघळले कसे या गोष्टीचा निश्‍चितच सरकारी यंत्रणेने कसून तपास केला पाहिजे, त्यासाठी मूळापर्यंत गेले पाहिजे, असे ते म्हणाले.

               सामाजिक दरी हळूहळू कमी व्हावी असे सर्वार्थाने प्रयत्न सुरु असतांना अशावेळी सामाजिक दरी विस्तारावी या दृष्टीने होणारे हे प्रयत्न गंभीर आहेत, या प्रकरणात शांतता व सुव्यवस्था, सलोखा राखतांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी व्यापक दृष्टी ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

              सरकारी यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर घेतलेल्या बैठकीतून काही गंभीर गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या आहेत. विशेषतः पोलिसांच्या गाडीवर उभे राहून केल्या गेलेले बंदचे आवाहन, हिंसक घटनेत अटक केल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी या युवकास पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निर्दयी प्रकार हे पोलिस यंत्रणा असो, पोलिस अधिकार्‍याच्या अपरिपक्वपणाचे उदाहरण आहे, असे नमूद करीत त्या गोष्टीचे गांभीर्य प्रशासनास किंवा संबधित अधिकार्‍यास कळालेच नाही, हे आश्‍चर्यकारक आणि दुर्देवी आहे, असे ते म्हणाले. परभणीतील या एकंदरीत प्रकरणात तीन पोलिस अधिकार्‍यांना केलेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी सूचना अ‍ॅड. मेश्राम यांनी केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या