🌟राज्यातील कोकण,मध्य महाराष्ट्रात तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता🌟
मुंबई :- राज्यात आधीच तापमान कमी झाले आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली असून यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाच्या नोंदींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यात थंडीची लाट येण्यास पोषक वातावरण असल्याचं खचऊ ने सांगितलंय. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबत द माध्यमावर पोस्ट करत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सध्या राज्यात ११ ते १४ अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान, हे तापमान आणखी खाली जाऊ शकते असं ते म्हणालेत. शिवाय राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलंय. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता वाढली असून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र वगळता येत्या २४ तासांत किमान तापमान ८ ते १४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोकण,मध्य महाराष्ट्रात तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या