🌟पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथे अखंड हरिनाम सप्ताह ; भागवत कथेचे आयोजन....!


🌟अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेला शुक्रवार दि.२० सुरुवात तर दि.२७ डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता🌟 

पुर्णा (दि.२० डिसेंबर २०२४) - तालुक्यातील फुलकळस येथे मागील ३१ वर्षांपासून चालत असलेल्या श्री. संत मोतीराम महाराज, मारोतराव महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. सप्ताह कालावधीत दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते १० सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते ४ श्रीमद भागवतकथा,सायंकाळी ५ ते ७ घुपआरती व रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन व रात्री हरिजागर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सप्ताह कालवधीत भागवतकार ह.भ.प. दत्ता महाराज पुरी हे भागवत कथा सांगणार आहेत. बालाजी गरड संगीत वाद्याचा गजर करणार आहेत शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी गावातून ग्रंथराज ज्ञानोश्वरीची भव्य दिंडी काढण्यात येणार आहे. ह.भ.प. कृष्णा महाराज दस्तापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. माधव महाराज मिसाळ, विठ्ठल महाराज माने,संतोष महाराज पुरी, तुकारामआण्णा गव्हाळे हे करणार आहेत. ह.भ.प. गजानन महाराज देऊळगावकर ह.भ.प. विलास महाराज गेजगे बोथीकर, ह.भ.प. दत्ता महाराज पुरी-बोर्डेकर भागवताचार्य, ह.भ.प. भगवान महाराज ईसादकर, ह.भ.प. भरत महाराज जोगी (परळी वैजनाथ), ह.भ.प. शंकर महाराज लोंढे (लोहा), ह.भ.प. यादवराव डाखोरे महाराज (पुणे), ह.भ.प. विठ्ठल महाराज माने फुलकळसकर यांचे कीर्तने होणार आहेत. मनमत नावकीकर ,बळीराम मिसाळ, दत्तराव व भीमराव देशपांडे, मुकिंद साबळे ,शिवाजी शिराळे, लिंबाजी शिराळे, हनुमंत मिसाळ, आदी अन्नदाते आहेत तर मृदंगाचार्य वैभव महाराज पांचाळ आळंदीकर, गायकवृंद पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळींनी साथ असणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या