🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


🌟सभात्यागानंतर काँग्रेसचे नेते मातोश्रीवर : शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन,मविआच्या आमदारांना शपथ घेण्याच्या सूचना🌟 

✍️ मोहन चौकेकर

💫 विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 288 पैकी 173 आमदारांनी घेतली शपथ तर ईव्हीएमचा निषेध करत विरोधकांचा सभात्याग ; सभात्यागानंतर काँग्रेसचे नेते मातोश्रीवर तर शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, मविआच्या आमदारांना शपथ घेण्याच्या सूचना 

💫 विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा परवा कामकाजात सहभागी होता येणार नाही, अजित पवारांची मविआच्या नेत्यांना वॉर्निंग ; मविआकडून सभात्याग करत वातावरणनिर्मिती, अबू आझमींकडून पहिल्याच दिवशी सेटबॅक, एकट्यानेच शपथ घेत दिला धक्का 

💫 विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल नार्वेकरांकडेच येण्याची शक्यता, उद्या अध्यक्षपदासाठी भरणार अर्ज, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा राहुल नार्वेकरांचा निर्धार ;  नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी होणार तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड 

💫 उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा, जप्त केलेली संपत्ती आयकर विभागाकडून मुक्त, दिल्लीच्या ट्रिब्यूनल कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय ; अजितदादांची 1000 कोटींची संपत्ती क्लीन, सुनेत्रा वहिनी अन् पार्थ पवारांचं आभिनंदन, संजय राऊतांचा खोचक टोला ;  जप्त केलेली अफाट संपत्ती पुन्हा अजित पवारांच्या खिशात, तळपायाची आग मस्तकात गेली, आयकर विभागाने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचा संताप 

💫 भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळण्याची शक्यता ;  मुंबई महानगरपालिका निवडणूक मनसे आणि भाजप एकत्र लढवण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांच्या सूचक वक्तव्यानंतर चर्चा सुरू 

💫 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेत महायुतीचे सभागृह नेते होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती, सरकारमध्ये शिंदेचं स्थान दुसऱ्या क्रमांकाचे निश्चित झाल्याची माहिती 

💫 आम्हाला 72 लाख मतं, पण 10 जागाच मिळाल्या, अजित पवार गटाला 58 लाख मतं मिळाली आणि त्यांच्या 41 जागा आल्या हे सगळं आश्चर्यकारक,  शरद पवारांनी कॅल्क्युलेशन मांडलं 

💫 विधानभवनात आदित्य ठाकरे- फडणवीसांचं हस्तांदोलन, मुनगंटीवार आणि भास्कर जाधवांची हात धरून विधीमंडळ परिसरात एन्ट्री, तर आव्हाड आणि शिरसाटांचं एकत्र हात उंचावून अभिवादन 

💫 मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप ; राज्यात बनावट औषध पुरवठ्याचा सुळसुळाट, नागपुरातील शासकीय रुग्णालयात बनावट औषधे सापडल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

💫 टीम इंडिया पराभवाच्या छायेत, दुसऱ्या दिवशी अर्धा संघ तंबूत, ऑस्ट्रेलियाकडे 29 धावांची आघाडी ;  ट्रेविस हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर

💫 राज्यातील विधानसभेत रोहित पाटील सर्वात तरुण आमदार : 25 ते 35 वयोगटातील 10 आमदार          

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या