🌟एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती ; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य🌟
✍️मोहन चौकेकर
💫 नव्या सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी, 5 डिसेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधीसाठी 19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती ; नागपुरातील 'चहावाला' जाणार महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला; देवेंद्र फडणवीसांच्या चाहत्याला विशेष निमंत्रण ; शपथविधीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून चर्चेसाठी पुढाकार, उदय सामंतांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
💫 भाजपकडून शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर,रवींद्र चव्हाण,पंकजा मुंडे,गोपीचंद पडळकर,श्वेता महाले,नितेश राणे,आदींची नावे चर्चेत ; वर्षा आणि सागर बंगल्यावर घडामोडींना वेग ; मला मंत्री करण्याची अजितदादांचीही इच्छा' आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्यानं उत्सुकता वाढली
💫 एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती ; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ;
💫 बाहेरच्या राज्यातून भाजपचे लोक येऊन काम करतात, त्या पद्धतीने मुंबई महापालिकेसाठी यंत्रणा राबवा; उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना
💫 घशात वेदना, पांढऱ्या पेशी वर-खाली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तपासणी ; मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नका, जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिरस्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ, शंभूराज देसाईंचा विरोधकांना इशारा
💫 तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे पराभव झाला, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य, कोणत्याही त्रासाला आणि धमक्यांना भीक घालणार नाही, विखे पाटलांना दिला इशारा ; ईव्हीएमसंदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
💫 एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची टीका ; गजाभाऊला उचलून आणणार, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांची पोस्ट चर्चेत, अंबादास दानवे म्हणाले, असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे 'कंभोजीकरण' केलं
💫 भरत गोगावलेंनी फोन करुन शिंदे गटात प्रवेश करा म्हणून सांगितलं होतं, मात्र गेलो नाही, ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचं वक्तव्य ;
💫 रान पेटलंय हे गुलाबराव पाटलांना मान्य, 5 तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा, सुषमा अंधारेंचा टोला
💫 CBSE पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार निवडता येणार परीक्षेची पातळी
💫 पोलिसांची कठोर भूमिका, माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे घेण्यात येणारे मतदान रद्द ; क्रांतीची 'तुतारी' फुंकत बंडाची पहिली 'मशाल' पेटवलीये, अभिनेते किरण माने यांची मारकरवाडीतील गावकऱ्यांसाठी खास पोस्ट
💫 सिगारेट, तंबाखू ते कोल्ड ड्रिंक महागणार, जीएसटी स्लॅब 35 टक्क्यांवर जाणार, जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता ; सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी, दोन दिवसांच्या घसरणीनंतर दरात पुन्हा वाढ, सोनं 152 रुपयांनी तर चांदी 1389 रुपयांनी महाग
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या