🌟बिड जिल्ह्यातील परळीत शिवभोजन केंद्र चालकाकडून जेवण मागणाऱ्या अपंगास लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण.....!

 


🌟मानवतेला काळीमा फासणाऱ्या शिवभोजन केंद्र चालका विरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना संतप्त🌟 

बिड (दि.२२ डिसेंबर २०२४) - बिड जिल्ह्यातील परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील सरकारमान्य शिवभोजन केंद्र चालकाने भुकेने व्याकूळ झाल्याने जेवणाची मागणी करणखऱ्या दिव्यांगास अक्षरशः लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहान केल्याची दुर्दैवी घटना घडली मानवतेला काळीमा फासणाऱ्या ही घटना घडत असतांना घटनास्थळावर उपस्थित असलेल्या व्यक्तीने हा मारहाणीचा प्रकार पाहून मध्यस्थी केली. सदरील शिवभोजन चालवणाऱ्या मालकाला कळायला पाहिजे होते की, दिव्यांग व्यक्तीने असा कोणता गुन्हा केला होता जेवणासाठी आलेल्या दिव्यांगला छातीत लाथा मारायच्या त्याच्या जवळ कोणी नाही ह्यामुळे जर त्या कडून काही चुक झाली असती तर त्याला पोलिसांना येई पर्यंत पकडून पोलिसांच्या स्वाधीन करायला हवे होते.

खाली पडून त्याच्या छातीत लाथा मारणे हे त्या शिवभोजनच्या मालका कडून दिव्यांगास अमानुष मारहान झाली तेव्हा पासून सदरील दिव्यांग कोणालाही सापडत नाही. त्याला ही पोलिसांनी शोधून काढावे. त्याचे काही बरे वाईट होऊ नये. पोलीस अधीक्षक साहेब यांनी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस निरीक्षक यांचे मार्फत दिव्यांग अधिनियम २०१६ (९२) १ नुसार अ शिवभोजनच्या मालका विरोधात गुन्हा के नोंदवून त्यांना अटक करावी तसेच क जिल्हाधिकारी साहेबांनी त्याचे लायसन रद्द करावे. अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा बीड च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शाहू डोळस यांनी केली आहे. नसता २३ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी बीड यांचे कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात येतील. याची सर्व स्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या