🌟मी पुन्हा येईन....देवेंद्र फडणवीसांनी खरे करुन दाखविले : देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड....!


🌟देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार🌟 


✍️ मोहन चौकेकर 

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवताच मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात भाषण करताना निरीक्षक निर्मला सीतारमण यांनी भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केलेल्या कामाचं मोठं कौतुक केलं. 

💫 देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री ; भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड :-


भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदाची बैठक आज पार पडली. या बैठकीसाठी भाजपचे सर्व आमदार, वरीष्ठ नेते, पक्षाचे निरीक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीला संबोधित केलं. त्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय रुपाणी यांनी केलं. यावेळी त्यांनी भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर जोरदार टाळ्या वाजवत, जयघोष करत सर्वांकडून या प्रस्तावाचं स्वागत करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण आणि पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी अनुमोदन दिलं. 

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवताच मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात भाषण करताना निरीक्षक निर्मला सीतारमण यांनी भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केलेल्या कामाचं मोठं कौतुक केलं राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता दहा दिवस उलटून गेले होते. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नव्हतं. मात्र, आता स्पष्ट झालं आहे. महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत जाऊन आल्यानंतर मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट झालं होतं. मात्र त्यानंतर आज फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. 

दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी नावं समोर आली होती.  धक्कातंत्र वापरलं जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भाजपकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या अर्थातच 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यामुळे आता नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री स्विकारणार आहेत त्यांच्या प्रमाणे एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री स्वीकारतात की आणखी दुसरे कोणी उपमुख्यमंत्री होणार या कडे  संपूर्ण महाराष्ट्राचे  लक्ष लागले आहे.                                      

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या