🌟परभणीतील विद्यानगर भागातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात बुधवारी श्रीमद् भगवद्गीता पठणाचे आयोजन..!


🌟प्रतिवर्षी साजरा होणार्‍या या उत्सवात शेकडो महिला, पुरुष भाविकांची उपस्थिती असते🌟

परभणी (दि.०९ डिसेंबर २०२४) : परभणी शहरातील विद्यानगर येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गीता जयंतीनिमित्त बुधवार दि.११ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता संपूर्ण १८ अध्याय श्रीमद् भगवद्गीता पठनाचे आयोजन करण्यात आले आहे.

            प्रतिवर्षी साजरा होणार्‍या या उत्सवात शेकडो महिला, पुरुष भाविकांची उपस्थिती असते. याही वर्षी जास्तीत जास्त भाविकांनी गीता जयंतीनिमित्त गीता पठणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रफुल्ल चामणीकर, सुहास बिडकर, अरुण कुमार पेडगावकर, शंकर आजेगावकर आदींनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या