🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


🌟पुष्पा 2 नं सहाच दिवसांत जमवला 1000 कोटींचा गल्ला; बाहुबलीच्या रेकॉर्ड मोडला🌟

✍️ मोहन चौकेकर

💫परभणीत आंदोलनाला हिंसक वळण, जमावाकडून तोडफोड, पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक, अनेक पोलीस जखमी, माथेफिरुकडून संविधानाच्या तोडफोडीनंतर ;  परभणीत पुढील आदेश येईपर्यंत जमावबंदीचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय 

💫आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट ; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक ;  पुण्यातील सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचे उघड 

💫महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार, शिंदे गटाच्या आमदारांना फिरते मंत्रिपदं देण्याची चर्चा ; गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिंदेंच्या शिवसेना आमदारांचाच होतोय विरोध 

💫खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच होण्याची चिन्हं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी दाखल, राजनाथ सिंहांसह दिग्गजांच्या भेटीगाठी ; नवं सरकार येताच अदालबदली सुरु, मंगेश चिवटेंना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी विभागावरुन हटवले, रामेश्वर नाईक यांच्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची  जबाबदारी  

💫फक्त 9 आमदार असताना दि.बा.पाटील झाले होते विरोधी पक्षनेते ; आता मविआला संधी मिळणार की नाही ? मुंबईत राजकीय घडामोडींना वेग ; बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा, म्हणाले, सामान्य जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही 

💫भाजप मविआला धक्का देणार, मिशन लोटस राबवणार ? शरद पवारांच्या पक्षाचे खासदार संपर्कात, आमदार प्रवीण दरेकरांचा दुजोरा ; लोकसभा, विधानसभेनंतर आता पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू 

💫ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा ; बर्थडे पार्टी पडली महागात! दिल्लीवरून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यानं दारूच्या नशेत महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं 

💫साताऱ्यातील हॉटेलमध्ये लाच घेताना न्यायाधीशालाच रंगेहात पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई  पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल ; 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र; 15 ऑक्टोबरपर्यंतच्या छाननीतील आकडेवारी समोर 

💫दिल्लीत आपचा स्वबळाचा नारा! महाराष्ट्रात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना 'एकला चलो'चा नारा देण्याची शक्यता ; इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला 

💫व्हेन कपूर्स मीट पीएम नरेंद्र मोदी... सैफ-करिना, आलिया-रणबीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; तैमूर, जेहसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून खास गिफ्ट                                

💫पुष्पा 2 नं सहाच दिवसांत जमवला 1000 कोटींचा गल्ला; बाहुबलीच्या रेकॉर्ड मोडला

💫केस-दाढी 31 डिसेंबरपर्यंत करुन घ्या, जानेवारीपासून सलून-ब्युटी पार्लरचे दर 20 ते 30 टक्क्यांनी  वाढणार ; खिशाला कात्री लागणार!

💫बिड जिल्ह्यातील अंबोजोगाई येथील शासकीय स्वरातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा ! निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच साडे आठ  हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली रुग्णांच्या जीवावर 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या