🌟ज्येष्ठ पत्रकार रविंद्र फोलाने ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या आदर्श पुरस्काराने सन्मानित.....!

                             


                🌟नागपूर येथे संपन्न झाले संघटनेचे 19 वे अधिवेशन🌟

✍️ मोहन चौकेकर 

 चिखली :  पत्रकार मित्रांचे पहिले संघटन असलेल्या ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल, महाराष्ट्र या संघटनेचे 19 वे राज्य संमेलन नागपूर येथे रविवार,दि. 15 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाले.  यावेळी महाराष्ट्रातील 15 मान्यवरांना आदर्श पत्रकार व प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथिल वरिष्ठ पत्रकार रविंद्र फोलाने यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    सविस्तर असे की, पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या लेखीणीतून समाजाच्या व्यथा मांडून त्या शासनदरबारी पोहचविण्याचे व न्याय मिळवून देण्याचे काम चिखली येथिल ज्येष्ठ पत्रकार रविंद्र फोलाने यांनी विविध वृत्तपत्र व स्वत:च्या वृत्तपत्रातून केले. त्यामुळे त्यांना पूढील कामाची नवप्रेरणा व उत्साह मिळावा यासाठी ऑल जनालिस्ट अ‍ॅन्ड फ्रेडस् सर्कलच्या नागपूर येथिल संम्मेलनात संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल व केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार, विश्वस्त अतुल होनकळसे, केंद्रीय खजीनदार सत्यवान विचारे, मुंबई अध्यक्ष इसार सय्यद, दिपक नागरे, बुलढाणा  जिल्हाध्यक्ष शाम देशमुख, ज्येष्ठ पत्रकार निलेश पोटे, ज्येष्ठ पत्रकार गणेश गोडसे पत्रकार नितीन फुलझाडे, नौशाद शेख अब्बास यांच्यासह  एजेएफसी संघटनेचे सर्व सदस्यगण व स्थानिक पत्रकार उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार रविंद्र फोलाने यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.             

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या