🌟हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ आ.कालिदास कोळंबकर यांची आज राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी नियुक्ती🌟
मुंबई (दि.०६ डिसेंबर २०२४) -महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर विधीमंडळाच्या तीन दिवशीय विशेष अधिवेशनाला उद्या शनिवार दि.०७ डिसेंबर पासून सुरुवात होत असून सदरील विशेष अधिवेशन दि.०९ डिसेंबर २०२४ पर्यंत चालणार आहे या अधिवेशनाच्या हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ आ. कालिदास कोळंबकर यांची आज आज शुक्रवार दि.०६ डिसेंबर रोजी राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी नियुक्ती केली.
विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी काल मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. पंतप्रधानांना वेळ नसल्यामुळे राज्यसरकारमधील इतर मंत्र्यांचा शपथविधी लांबलेला आहे. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचे सांगितले होते. ७ डिसेंबरपासून मुंबईत या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक, नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी होणार आहे. हे अधिवेशन ७ पासून ९ डिसेंबर पर्यंत तीन दिवस चालणार आहे. आज राजभवनात राज्यपालांनी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आ. कालिदास कोळंबकर यांना शपथ दिली. विधीमंडळाचे अधिवेशन घ्यायचे असेल तर विधानसभा अध्यक्ष असणे आवश्यक आहे. विधान परिषदेला देखील अध्यक्ष नाही. उपाध्यक्ष निलम गोहे यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार आहे. विशेष अधिवेशनासाठी विधीमंडळ सचिवालयाकडून सर्व कर्मचाऱ्यांना तयारीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर, ९ डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्ष निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर, १६ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे, नव्या सरकारचे कामकाज आता सुरू झाले आहे......
0 टिप्पण्या