🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या......!


🌟उदय सामंतांना उपमुख्यमंत्रिपद दिलं तर ते एक मिनिटात एकनाथ शिंदेंनाही सोडून जातील,सुषमा अंधारेंचा टोला🌟

💫 महाराष्ट्र राज्यात तिसऱ्यांदा 'देवेंद्र सरकार' मी पुन्हा येईन.....देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिलेला शब्द खरा करुन दाखवला......देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर, शाहरुख खानसह आदी सह असंख्य मान्यवरांच्या व 40 हजार उपस्थितीत ग्रँड शपथविधी सोहळा संपन्न 

💫 अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे राजी,उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली,अजित पवारही सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्यात तिघांचीच शपथ 

💫 मविआच्या बड्या नेत्यांची महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ, निमंत्रण देऊनही शरद पवार, उद्धव ठाकरे अनुपस्थित, पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण ; लढाई संपल्यावर फडणवीसांनी वैर बाजूला ठेवलं, शरद पवारांना फोन करुन शपथविधीचं दिले  निमंत्रण, पण...शरद.पवार म्हणाले,संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे,  शपथविधीच्या कार्यक्रमाला येता येणार नाही  

💫 देवेंद्र फडणवीसांची मु्ख्यमंत्रीपदी शपथ,आमदार अभिमन्यू पवार तुळजापूरला पायी जाऊन नवस फेडणार 

💫 बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत, महायुतीच्या शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया 

💫 एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास इच्छुक नव्हते, उदय सामंत यांचा दावा ; उदय सामंतांना उपमुख्यमंत्रिपद दिलं तर ते एक मिनिटात एकनाथ शिंदेंनाही सोडून जातील, सुषमा अंधारेंचा टोला 

 💫 काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला : वायनाडमधील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी केंद्राकडे 2 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी 

💫 झोमॅटोच्या शेअरनं 22 महिन्यात दिला 512 टक्के परतावा, शेअर पहिल्यांदा 300 पार, गुंतवणूकदार मालामाल 

💫 पुणे जिल्ह्यातील इंदापुरात चाकूने सपासप वार करुन विवाहितेचा निर्घृण खून, निमगांव केतकी गाव हादरलं, आरोपी अटकेत ; धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर 

💫 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी के एल राहुल आणि यशस्वी जैस्वालच सलामीला उतरणार, रोहित शर्माची माहिती,उद्यापासून दुसरा सामना

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या