🌟अकोला जिल्हा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ राज्यात सर्वोत्कृष्ट......!


🌟रंगा अण्णा वैद्य यांचा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने होणार सन्मान🌟 

✍️ मोहन चौकेकर                                                        

 पुणे : यंदाचा "संचार" कार रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाला जाहीर करण्यात आला आहे.. मराठी पत्रकार परिषदेच्या नुकत्याच पुणे येथे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.... यापुर्वी नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, बीड, नांदेड, भंडारा, रत्नागिरी आदी जिल्हा पत्रकार संघाना हा पुरस्कार दिला गेला आहे..जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सेलू येथे होणारया कार्यक्रमात आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे..

अकोला जिल्हा पत्रकार संघ गेली 50 वर्षे परिषदेशी जोडला गेलेला आहे.. पत्रकारांसाठी संघाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात.. त्याच बरोबर मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व उपक्रमात, आंदोलनात पत्रकार संघाचा कायम सहभाग असतो..पुरस्काराबद्दल अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील पत्रकारांचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख यांनी अभिनंदन केले आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या