🌟विधानसभा निवडणुतील पराजयाने खचुन न जाता, आपण जनसेवेसाठी सदैव तत्पर राहु - विशाल कदम


🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळसलगत असलेल्या माखणीतील मंदिराच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते म्हणाले🌟


 
पुर्णा/ताडकळस (दि.१६ डिसेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुतील पराजयाने खचुन न जाता, आपण जनसेवेसाठी सदैव तत्पर राहु तालुक्याचा व मतदार संघातील विकास कामसाठी आपण पुढेही लढत राहु असा विश्वास माखणी येथे बोलतांना शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी  व्यक्त केला.

आज दि. 16 रोजी ते माखणी येथे बोलत होते.माखणी येथे गंगाखेड मतदारसंघाचे उमेदवार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल भाऊ कदम यांनी माखणीमध्ये येऊन मंदिराच्या कामाचे भूमिपूजन केले व माखणी गावकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेला मला भरभरून असे मतदान केले त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी माखणी गावामध्ये येऊन संवाद साधला या कार्यक्रमाला ताडकळसचे सरपंच गजानन आंबोरे उपसरपंच प्रतिनिधी संजय जलारे, ह.भ. प .गंगाधर महाराज तांबे, पत्रकार सुरेश मगरे, तुकाराम आळणे,  उत्तम नाना अंभोरे आदीची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना विशाल कदम यांनी सांगितले की कुठलीही अडचण व कुठलीही काम पडले तर गावकऱ्यांनी संकोच न करता माझ्याकडे यावे व मला आवर्जून फोन करावा आपण सदैव नागरीकांच्या अडी अडचनी सोडविण्यासाठी तत्पर राहु असे मनोगत  कदम त्यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील आवरगंड, शिवाजी आवरगंड, सचिन आवरगंड, विष्णु आवरंगड आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.  सेवटी आभार प्रदर्शन प्रगतीशील  जनार्धन आवरगंड यांनी व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या