🌟दादर रेल्वे स्थानकाच्या फलकावर 'चैत्यभूमी' नावाचे स्टिकर लावून रिपब्लिकन सेनेच्या वतीने केले आंदोलन🌟
मुंबई (विशेष वृत्त) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी ०६ डिसेंबर रोजी प्रतिवर्षी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने निळा जनसागर जमा होत असतो दादर येथील चैत्यभूमीवरील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यात यावं ही मागणी मागील अनेक वर्षांपासून तमाम आंबेडकरवादी जनसमुदायाकडून होत आहे.
मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकाचे महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी नामांतर झाले तर हिच खरी या महामानवाला आदरांजली ठरेल असा दृढ निर्धार केलेल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा या आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या शहरातील भुमीपूत्र तथा परभणी जिल्हा रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी व नांदेड जिल्हा रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे या वाघांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह दादर रेल्वे स्थानकाच्या नावाच्या बोर्डावर चैत्यभूमी नावाचा बोर्ड लावून आंदोलन केले.
यावेळी नांदेड कामगार जिल्हाप्रमुख संतोषभाऊ साळवे पूर्णा तालुका प्रमुख नामदेव कानकटे ताडकळस सर्कल प्रमुख संतोष कांबळे पूर्णा तालुका पूर्णा विद्यार्थीआघाडी तालुका प्रमुख नितीन गजभारे शहर प्रमुख राहुल भाऊ ढगे कामगार शहर प्रमुख मा सुनील जोंधळे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.....
0 टिप्पण्या