🌟ग्रामीण महिलांना स्वावलंबी होण्यासाठी शेळीपालन फादेशीर : सहयोगी अधिष्ठाता डॉ.सुधीर राजूरकर यांचे मत....!


 🌟पाच दिवशीय शेळीपालन प्रशिक्षणाचे उद्घाटन संपन्न🌟

परभणी (दि.१७ डिसेंबर २०२४) : ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी होण्यासाठी आणि अर्थार्जनासाठी शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो असे मत पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर राजूरकर यांनी व्यक्त केले.

             महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत माविम प्रकल्प (मोड्यूल-२) अंतर्गत पाच दिवसीय निवासी शेळीपालन प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले असून आज या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर राजूरकर, प्रमुख पाहुणे  म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, जिल्हा प्रकल्प सल्लागार पुंडलिक धामोडे, मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख, प्रकल्प सह समन्वयक डॉ. संदीप रिंढे यांची उपस्थिती होती. माविम प्रकल्पाअंतर्गत शेळी पालन करणार्‍या महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि पशुसखी महिलांचा क्षमता विकास करण्याकरिता मोड्यूल-2 अंतर्गत येथील पशूवैद्यकीय महाविद्यालयात या पाच दिवसीय निवासी शेळीपालन प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजूरकर यांनी यावेळी दिली.

            प्रशिक्षण समन्वयक डॉ. संदीप रिंढे यांनी प्रशिक्षणादरम्यान देण्यात येणारे व्याख्यान व प्रात्यक्षिक विषयी सविस्तर माहिती दिली. पशु सखींना कौशल्य विकासांतर्गत पाच दिवसांच्या निवासी प्रशिक्षण उदघाट्न प्रसंगी साहित्य किटचे वाटप महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अनिता चप्पलवार यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आणि मुख्यप्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख यांच्या सल्ल्याने प्रकल्प तथा प्रशिक्षनाचे समन्वयक डॉ. संदीप रिंढे, सह समन्वयक, डॉ. अनिता चप्पलवार, डॉ. संजयकुमार लोंढे, डॉ. अमोल पाटील, डॉ. मकरंद खरवडकर, डॉ. कल्याण टेकाळे,  सहाय्यक नियंत्रक संजय खेडकर, सहाय्यक कुलसचिव ऋषिकेश कांबळे आणि लिपिक तथा टंकलेखक अविनाश जाधव यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि पदव्युत्तर विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

💫विविध विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन :-

              या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ३० पशुसखी महिला प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या शेळीपालन प्रशिक्षणा दरम्यान विस्तार कार्याचा आराखडा तयार करणे, संवाद कौशल्य, प्रमुख संचाराकाची निवड करणे, तंत्रज्ञान स्वीकार करणार्‍यांचे वर्गीकरण व समूहाची कार्यपद्धती, रोगी शेळी ओळखणे व प्रथमोपचार, खच्चीकरणाचे महत्व, शेळीपालनातील रोजगार, उद्योजकतेच्या संधि, आदर्श उद्योजक कसा असावा?, शेळ्यातील, करडातील मरतुक व उपाय, गांडूळ खत व कंपोस्ट खत तयार करणे, कळपातील शेळ्या एकाच वेळी माजावर आणणे व शेळ्यातील कृत्रिम रेतन, ईदसाठी करा बकरी संगोपन,  शेळ्यातील आदर्श परिचालन प्रणाली, मुरघास तयार करणे,  शेळीच्या दुधाचे पदार्थ निर्मिती: चीज, पनीर, खवा, पेढा ई., रोग निदान प्रयोगशाळेचे महत्व व रोगनिदानासाठी नमुने गोळा करणे आणि शेळी व शेळीपासून मिळणारी विविध उत्पादने व त्यांची विक्री व्यवस्था अशा विविध विषयावर महाविद्यालयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिकासह देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या